Tag Archives: स्ट्रॉबेरी

फलमाधूरी

साहित्य :

  • अर्धी वाटी बारीक चिरलेले सफरचंदाचे तुकडे
  • १०-१२ हिरवी द्राक्षे
  • १-१ मोसंबी व संत्रे
  • १ वाटी घट्ट गोड दही
  • २ मोठे चमचे ऑरेंज स्क्वॅश किंवा स्ट्रॉबेरी क्रश
  • पाव चमचा लिंबाचा रस
  • १ चमचा मीठ

कृती :

संत्रे व मोसंबी सोलून पाकळ्या सुट्या कराव्या, द्राक्षे धुवावी, बियांची द्राक्षे असल्यास अर्धी चिरून बिया काढाव्या. द्राक्षांची साल काही वेळा जाड असते. सोलावी. सफरचंद चिरून त्यावर लिंबाचा रस घालावा म्हणजे तुकडे काळे पडणार नाहीत.