Tag Archives: स्वपन चौधरी

मर्मबंधातली ठेवणी

मर्मबंधातली ठेवणी

मर्मबंधातली ठेवणी

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या सत्रात हरिप्रसाद चौरासीया यांच्या मधुर बासरीने रसिक मंत्रमुग्ध झाले. पंडितजींची बासरी ऎकण्यासाठी रसिकांनी प्रंचड प्रमाणात गर्दी केली होती. त्याचप्रमाणे ‘आनंदगंधर्व’ म्हणून ओळखले जाणारे गायक आनंद भाटे यांनी ‘माझे माहेर पंढरी’ हा पंडित भीमसेन जोशी याचां अभंग सादर करून मंडप दणाणून सोडला. आंनद भाटे यांच्या किराणा घराण्याच्या गायकीने रसिक भारावून गेले.

पाचव्या सत्राचे मुख्य आकर्षण ठरलेल्या गायक आरती अंकलीकर, स्वपन चौधरींचा तबला आणि उस्ताद अमजद अली खान यांच्या यांचे सरोदवादन हे परोमच्च बिंदू ठरले. आरती अंकलीकर यांनी दादरा आणि भीमपलास राग सादर केला. त्यांनी गायलेल्या ‘बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल’ या अभंगाने अवघा स्वरमंडप निनादून गेला.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलाकार स्वपन चौधरींच्या तबल्याने रसिक भारावून गेले. त्यांनी तीन तालातील रचना सादर केल्या. पडन, चक्रधर आणि गत वाजवताना तबल्यावर पडणारी त्यांची थाप आणि थिरकणारी बोटे असा दृकश्राव्य नजरणा रसिकांना मिळाला. पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि किराणा घराण्याचे गायक यांनी आपल्या गायकीने स्वरमडंप गाजवला. उस्ताद अमजद अली खाँ यांचे सरोदवादन तर या मैफिलीचा हाय पॉंइंट ठरला. अमजद अली खाँ यांनी चारूकेशी आणि जिला काफी राग सादर केले. त्यांच्या सरोदातून निघणाऱ्या मधूर ध्वनी लहरी अंतरगाला भिडणाऱ्या होत्या. सवाईच्या प्रत्येक मैफिली ही मर्मबंधातली ठेवणीच ठरत आहे.