Tag Archives: स्वरभास्कर

लता मंगेशकर यांना ‘स्वरभास्कर’ पुरस्कार

लता मंगेशकर यांना 'स्वरभास्कर' पुरस्कार

लता मंगेशकर यांना 'स्वरभास्कर' पुरस्कार

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे महापालिकेच्या वतीने ‘स्वरभास्कर’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या प्रथम मानकरी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर ठरल्या आहेत. दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ नृत्यांगना सितारा देवी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे महसापौर मोहनसिग राजपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम उपस्थित राहणार आहेत. मानपत्र, रोख रुपये १ लाख, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.