Tag Archives: स्वरुपवर्धिनी ढोल पथक

पुणेरी माणुस, पुणेरी पगडी आणि आता पुणेरी ढोल

पुणेरी माणुस, पुणेरी पगडी आणि आता पुणेरी ढोल

पुणेरी ढोल

वार रविवार वेळ रात्री चे ९.३० १० रस्त्यावर फारशी रहदारी नाही अशातच एक अ‍ॅक्टिवा सरकन बाजुने गेली. पण कितीतरी वेळ ती अ‍ॅक्टिवा दिसेनाशी होइपर्यंत नजर तिथून हटत नव्हती कारण त्या अ‍ॅक्टिवावरुन जाणाऱ्या दोन मूली, नुकत्याच त्या ढोल पथकाच्या सरावावरुन परत होत्या हे निश्चित. पाठी बसलेली मुलगी हातातल्या काठीने स्वत.च्याच मांडीवर ताल धरुन सराव करत होती. ह्ल्ली हे चित्र पुणे शहरात कॉमन झालय. गणेशोत्सोवाच्या पार्श्वभूमीवर पूणे आणि आजुबाजूचा परिसर ढोल आणि ताशांच्या सरवाने दुमदून गेला आहे. अलिकडच्या काही वर्षांत पुणेरी ढोल पथकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी माणूस मूळताच उत्सव प्रिय आहे. कोणत्याही मंगलकार्य किंवा उत्सवांना वाद्यांची जोड ही हवीच. त्यातही गणेशोत्सावातील मिरवणुका आणि पुणेरी ढोल हे जणू समीकरणच होऊन बसलं आहे. ढोल, तडतडणारा ताशा आणि घंटानाद म्हणजेच पूणेरी ढोल. इतकं साधं कॉम्बिनेशन असणाऱ्या या पुणेरी ढोल ने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आज पुण्यात नोंदणीकृत ७० ढोल पथकं आहेत. गणेशोत्सवापासून ते कॉरपोरेट इवेन्ट पर्यंत अनेक कार्यक्रमात रंग भरण्याचे काम ही ढॊल पथकं करतात. गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या अनेक शहरांतून या ढोल पथकांना मागणी असते.

पुर्वी पुण्यात काही मोजकीच ढोल पथक होती. बॅन्जो,बॅन्ड या वादयपथकांच्या तुलनेत पूणेरी ढॊल पथकांचे स्वरूप मर्यादित होते. उत्सव काळात वादनाच्या सूपाऱ्या घेऊन वादन करणे हेच मुख्य उद्दिष्ट्य असायचे. पंरतू बदलत्या कालानुसार या ढोल पथकांनी कात टाकली. शिस्तबद्ता, विशिष्ट लय , खास मराठमोळा पेहराव यामुळे आज या पथकांनी आपला ब्रॅण्ड तयार केला आहे. आता तर पथकांच्या वेबसाईट्स ही आहेत. बदलत्या काळानुसार केलेले बदल, चित्रपट संगीतात झालेला पुणेरी ढोलचा वापर, सोशल नेटवर्किंग, मिडिया यामुळे ऎकणूच पुणेरी ढोल पथकांना सुगीचे दिवस आल्याचं ढोल ताशा महामंडळाचे कार्यध्यक्ष आणि शिवगर्जना ढोल पथकाचे अध्यक्ष अ‍ॅड. शिरीष थिटे यांनी सांगितले. या ढोल पथकांमध्ये काही ढोल पथकं अशी आहेत जी केवळ निव्वळ नफा न कमवता सामजिक कार्य ही करतात. स्वरुपवर्धिनी सारख्या संस्थेत तर तरूणांपासून आबालवृद्ध सामील असतात. ही संस्था केवळ गणेशोत्सवा पुरती एकत्र न येता वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी हॊऊन सामाजिक कार्य करतात.

शिवगर्जना ढोल पथक तर मिळालेल्या मानधनतून ख्रर्च भागवून उरलेली रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरतात. गेल्या वर्षी या पथकाने ८० हजाराचा निधी मतिमंद शाळेला दिला. याबरोबरच शिवगर्जना या ढोल पथकाने परदेशातही आपली मोहर उमटवली आहे. सिडनी इथे २००७ साली सुरु केलेली शिवगर्जनाची शाखा तिथेही नावारुपाला आली आहे. सुरवातीला ही कल्पना सिडनीवासियांच्या पचनी पडायला वेळ लागला पण आता तिथेही या ढोल ताशा पथकाने आपली कला रुजवली असे पथकाचे अध्यक्ष अ‍ॅंड शिरीष थिटे यांनी संगितले. सलमान खानच्या गणपती मिरवणुकीत मागच्या वर्षी पुण्याच्याच नादब्रम्ह ढोल पथकाला बोलवण्यात आल होते. अशी ही ढोल पथकं. सण, समारंभात उत्साह त्याबरोबरच शोभा ही वाढवतात.

सळसळत्या चैतन्याचं प्रतिक बनलेल्या या ढोल पथकांच्या यशात तरूणाईचा सिंहाचा वाटा म्हणवा लागेल. कादाचित त्यांच्यातील जोश आणि उत्साह या ढोल पथकांचा आत्मा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुलांबरोबर मुली ही तेवढ्याच जोशाने आणि ताकदीने या पथकात सामील होतात. शाळा कॉलेज करून हे युवक युवती ठरलेल्या वेळेत सरावाला हजर असतात. यातले बहुतेक जण स्वंयसेवक असतात. या सर्वांचा सराव उत्सवाच्या दोन महिने आधी सुरु होतो. या पथकांमध्ये मुलींचे प्रमाण ही उल्लेखनीय आहे. मिरवणूकीत स्टॅमिना टिकवण्यासाठी या मुलीनां आहार विहाराबाबत मार्गदर्शन केले जाते. मुलांच्या तुलनेत मुलींची एनर्जी थोडी कमी पडते. त्यामूळे कमी ताकद लावून ढोल वाजवण्याच्या टिप्स ,वजन न वाढता पटकन उर्जा देणारा आहार त्याबरोबरच पाय दुखत असल्यास घ्यावयाचे उपचार याबाबत ही त्यांना पथकांकडून मार्गदर्शन केले जाते. त्याबरोबरच मिरवणुकी दरम्यान त्यांच्यासाठी ग्लुकोज आणि लिंबू पाण्याची सोय केलेली असते. तरूणांबरोबरच कर्मचारी वर्गही यात सहभागी होतो. सततच्या सरावाने किंवा वादनाचा परीणाम या कार्यकर्त्यावर होत असेल का? असा प्रश्न नेहमीच आपल्याला पडतो. कारण काही वेळा नंतर किंवा प्रमाणानंतर आवाज चे रुपांतर ध्वनी प्रदुषणात होते. ढोल ताशा या पांरपारिक वाद्याच्या आवाचा प्रभाव डॉल्बी किंवा इतर वाद्यांसारखा नसतो. या आवाजामुळे हार्ट बिट वाढत नाही किंबहुना १५ मिनीटांनी वादक वाद्यांच्या आवाजाला use to झालेले असतात तरही त्यांना खबरदारी म्हणुन कानात बोळे घालण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना विशेषकरून लहान मूलांना दिला जातो असं अ‍ॅड. शिरीष थिटे यांनी सांगितले.

पुणेरी माणुस, पणेरी पगडी, पुणेरी पाट्या याबरोबरच आता पूणेरी ढोल ने ही पूण्याची शान वाढवली हे नक्की.