Tag Archives: हार्वर्ड विद्यापीठ

असा आहे मार्क झुकरबर्ग

मार्क झुकरबर्ग

मार्क झुकरबर्ग

मार्क झुकरबर्ग हा हार्वर्ड विद्यापीठाचा ड्रॉप आउट आहे. मार्ककडे कोणत्याही बिझनेस स्कूल ची पदवी नाही तरीही त्याने फेसबुकसारख्या साईटची धुरा यशस्वीपणे संभाळली आहे. फेसबुकच्या ऑफिस मधलं वातावरण अतिशय मोकळं आहे. तिथे कोणीही बॉस नाही. आपल्या सगळ्यांना फेसबुकवर जसं स्वातंत्र मिळतं तसच ते फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ऑफिसमध्येही मिळतं. सुरवातीच्या काळातील फेसबुकची ऑफिसेस तर आपल्याकडे महानगरपालिकेची असतात तशी होती. झुकरबर्गसारखीच त्याची ऑफिसेस साधी होती.

झुकरबर्गचं व्यक्तीमत्व आणि जीवनशैली अत्यंत साधी आहे. झुकरबर्ग कधीच कॉरपरेट कपडयांमध्ये नसतो. अमिरेकेतील सेलिब्रेटिजचा पाठलाग करणारे पापाराजी तर झुकरबर्गची साधी जीवनशैली पाहुन चकितच झाले. रविवारच्या दिवशी सामान्य माणसासारखा बाजारात जाणारा आणि जमिनीवर बसुन मेक्सिकन सॅण्डविच चा आंनद लुटणारा अब्जाधिश पाहुन वर्तमानपत्रांचे फोटोग्राफ्रर अचंबित तर झालेच पण त्याचबरोबर हाती काहीच न लागल्याने नाराजही झाले. जगातल्या सर्वात कमी वयाच्या या अब्जाधिशावर अमिरेकेत २०१० मध्ये ‘द सोशल नेटवर्क’ हा सिनेमाही निघाला. या सिनेमाला ३ ऑस्कर मिळाले आहेत. त्याच्या फेसबुकवरच्या स्व:ताच्या पेजवर त्याने रेव्हलुश्न, ओपननेस, कनेक्टीव्हीटी, शेअरिंग, या गोष्टी पर्सनल इंटरेस्ट मध्ये नमुद केल्या आहेत. वयाच्या २८व्या वर्षी अमिरेकेतल्या श्रीमंताच्या यादीत १४ व्या स्थानावर असणारा झुकरबर ‘कलर ब्लाइन्ड’ आहे. म्हणुनच फेसबुकचा रंग निळा आहे कारण झुकराबर्ग ला त्या रंगाचे ज्ञान आहे.

१८ मे ला फेसबुकने सामान्य माणसाठी फेसबुकचे शेअर्स काढले आणि या शेअर्स नी बाजारात धुमाकूळ घातला. या शेअर्स मुळे फेसबुकला करोडोचा फायदा झाला. फेसबुकच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ७०० इतकी असुन कॅलिफोर्नियातल्या ‘मेन्लो पार्क’ इथं फेसबुकचं मुख्य कार्यालय आहे. एकुण १२ देशात फेसबुकची कार्यालयं आहेत. फेसबुकला मिळणाऱ्या जहिरातींमुळे फेसबुकला विनामुल्य सेवा देणं शक्य झालं आहे. झुकरबर्ग चा साधेपणाच हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्याने लग्न केलं तेही साधेपणाने. आठ वर्ष जुनी मैत्री असलेल्या प्रिसाला चान बरोबर तो १८ मे ला लग्नाच्या बंधनात अडकला. यात ही त्याची कमिटमेन्ट दिसुन येते. या लग्नाला मोजके १०० निमत्रिंत होते आणि त्यानां आपल्याला कशासाठी बोलवले आहे याची कल्पनाही नव्हती. असा सामान्यातला असामान्य मार्क झुकरबर्ग आजच्या तरुण पिढीसाठी खराखुरा आयडल आहे.