Tag Archives: हिरव्या मिरच्या

मैद्याच्या चकल्या

साहित्य :

  • २ फुलपात्रे मैदा
  • २ मध्यम उकडलेले बटाटे
  • १ टे. चमचा लोणी
  • ७-८ हिरव्या मिरच्या
  • १ आल्याचा मोठा तुकडा
  • मीठ

कृती :

मैदा एका कपड्यात बांधून पुरचुंडी करा व अकुकरात एका चाळणीवर ठेवून २० मिनिटे वाफवून घ्या.
काढल्यावर लगेचच मोकळा करा. त्यात उकडलेल्या बटाट्याचा कीस, वाटलेल्या मिरच्या, आले मीठ, व लोणी घालूनपीठ भिजवा (हळद नको) चांगले मळून घ्या व मंदाग्निवर चकल्या तळा.