Tag Archives: हुसैनी कबाब मसाला

हुसैनी कबाब मसाला

प्रमाण: ४ व्यक्तिसाठी.

साहित्य:

  • २ उकळलेले बटाटे
  • २ गाजर
  • १०० ग्रा. फेंच बीन्स
  • १ कांदा
  • २ चमचे टोमॅटो सॉस
  • ५० ग्रा. काजू
  • १०० ग्रा. वाटाणे
  • थोडासा पुदीना
  • २ चमचे लाल मिरची
  • एक लिंबाची खाप
  • १ चमचे साखर
  • १०० ग्रा. कॉर्नफ्लोअर
  • चवीनुसार मीठ
  • थोडासा गरम मसाला
  • पालक ग्रेवी
  • हिरवी चटणी
  • चीज

कृती:

हुसैनी कबाब मसाला

हुसैनी कबाब मसाला

गाजर, वाटाणे आणि फ्रेंच बिन्स उकळून घ्यावे त्यानंतर व पाण्यात काढून कुस्करून घ्यावे.

बटाटे आणि पुदीना बारीक कापून यात टाकावा आणि सर्व सामाग्रीस व्यवस्थित मिळवावे. नंतर यात लिंबू पिळून साखर व मसालाही टाकावा.

आता याचे छोटे छोटे गोळे बनवावे आणि ह्या गोळ्यांना कॉर्नफ्लोअरमध्ये गुंडाळून लालसर होईपर्यंत तळावे.

नंतर पालक ग्रेवी, हिरवी चटणी व चीज याबरोबर गोळे प्लेटमध्ये सजवावे.