
हैद्राबादी भात
साहित्य:
- ५०० ग्रा. बासमती तांदुळ
- एक कापलेला कांदा
- २५० ग्रा. भेंडी
- ८-१० पाकळी लसूण
- १ चमचा आले
- चुटकीभर केशर
- अर्धा चमचा बारीक कापलेला संत्र्याचे छिलके
- ५० ग्रा. मनुके
- एक चमचा लिंबाचा रस
- तीन मोठे चमचे कॉर्नफ्लावर तेल
सजविण्यासाठी:
- भाजलेले बादाम
- बारीक कापलेली कोथिंबीर
कृती:
तेलास एका पातेल्यात गरम करावे आणि कांदा टाकुन लालसर भाजावे. आता पेपरवर काढुन तेल सुकवून घ्यावे. म्हणजे कांदा कुरकुरीत होईल.
गॅस कमी करून लसूण आणि अदरक एक मिनीट भाजावे. तांदूळ, भेंडी, तिखट टाकावे, नंतर केशर आणि संत्र्याची साले ताकुन उकळावे.
उकळी आल्यावर गॅस कमी करावा आणि १५ मिनीट शिजवावे. पाणी सुकल्यानंतर मनुके टाकुन वरून लिंबाचा रस टाकावा.
पाहिजे तर संत्र्याची साले काढुन टाकावे आणि कोथिंबीर व बदामाने सजवून वाढावे.