- –
ठळक घटना
- ३० : ऍक्टियमच्या लढाईत मार्क अँटोनीची हार झाल्याचे कळल्यावर क्लिओपात्राने आत्महत्या केली.
- १०९९ : पहिली क्रुसेड-ऍस्केलॉनची लढाई – क्रुसेड समाप्त.
- १२८१ : जपानवर चाल करून येणारे कुब्लाई खानचे आरमार वादळात नष्ट.
- १४८० : ओट्रांटोची लढाई – ८०० ख्रिश्चन युद्धबंद्यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यावर ऑट्टोमन सैनिकांनी त्यांची हत्या केली.
- १९०८ : सर्वप्रथम फोर्ड मॉडेल टी कार तयार झाली.
- १९१४ : पहिले महायुद्ध – ग्रेट ब्रिटनने ऑस्ट्रिया-हंगेरीविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४४ : वाफ्फेन एस.एस.च्या सैनिकांनी सांताआना दि स्ताझेमा शहरात ५६० व्यक्तींची हत्या केली.
- १९४८ : भारतीय हॉकी संघाने अॅलिंपिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळविले.
- १९५२ : मॉस्कोमध्ये १३ ज्यू कवींची हत्या.
- १९५३ : सोवियेत संघाने आपल्या पहिल्या परमाणु बॉम्बची चाचणी केली.
- १९६४ : वंशभेद केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेची ऑलिंपिक खेळातून हकालपट्टी.
- १९८१ : आय.बी.एम.ने पहिला वैयक्तिक संगणक विकायला काढला.
- १९८२ : मेक्सिकोने दिवाळे काढले.
- १९८५ : जपान एरलाइन्स फ्लाइट १२३ हे विमान माउंट ओगुरावर कोसळले. ५२० ठार.
- २००० : रशियाची कुर्स्क ही पाणबुडी बॅरंट्स समुद्रात बुडाली.
- २००५ : श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कडिरगमारची हत्या.
- २०१० : मुंबई मध्ये मग्रुर रिक्षा टॅक्सी चालकांना आवर घालण्यासाठी जागरुक प्रवाशांनी स्वयंस्फूर्तीने ‘मीटर जॅम’ आंदोलन पुकारले.
जन्म
- १५०३ : क्रिस्चियन तिसरा, डेन्मार्क आणि नॉर्वेचा राजा.
- १६२९ : ऍलेक्सेइ पहिला, रशियाचा झार.
- १६४३ : अफोन्सो सातवा, पोर्तुगालचा राजा.
- १६४७ : योहान हाइनरिक ऍकर, जर्मन लेखक.
- १७६२ : जॉर्ज चौथा, इंग्लंडचा राजा.
- १८५९ : कॅथेरिन ली बेट्स, अमेरिकन कवियत्री.
- १८६६ : जॅसिंतो बेनाव्हेंते, नोबेल पारितोषिक विजेता स्पॅनिश लेखक.
- १८८७ : इर्विन श्रोडिंजर, नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९७ : मॉरिस फर्नांडेस, वेस्ट ईंडीझचेा क्रिकेट खेळाडू.
- १८९९ : बेन सीली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९१० : युसोफ बिन इशाक, सिंगापूरचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९१९ : विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२३ : जॉन होल्ट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२४ : डेरेक शॅकलटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२४ : मुहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष.
- १९४० : एडी बार्लो, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४९ : मार्क नॉप्फलर, स्कॉटिश संगीतकार.
- १९५६ : सिदाथ वेट्टीमुनी, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६० : ग्रेग थॉमस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६१ : मार्क प्रीस्ट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ : स्टुअर्ट विल्यम्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७१ : पीट साम्प्रास, अमेरिकन क्रिकेट खेळाडू.
- १९७२ : ग्यानेंद्र पांडे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७३ : रिचर्ड रीड, अतिरेकी.
- १९७६ : पेद्रो कॉलिन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मॄत्यु
- १८४८ : जॉर्ज स्टीफनसन्स, वाफेवर चालणार्या रेल्वेचा शोध.
- १९७३ : दयानंद बांदोडकर, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री.