Tag Archives: २००९

अजून एक महिना पाणी पुरेल

अजून एक महिना पाणी पुरेल

अजून एक महिना पाणी पुरेल

जून महिन्यात पावसाने निष्क्रियता दाखवल्यामुळे पाणीकपात करण्याची व ती वाढवण्याबाबत चर्चा सुरु झाली. पण ही स्थिती काही अभूतपूर्व नाही. २००९ आणि २०१० मध्ये पुणेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. पण गेल्या वर्षी ही स्थिती आली नव्हती. १.१९ अब्ज टीएमसी पाणीसाठा सध्या खडकवासला प्रकल्पात आहे व तो ७ ऑगस्ट पर्यंत पुरण्याची शक्यता आहे.

यावर्षी मात्र पुणेकरांना मार्च महिन्यापासूनच पाणीकपाताला सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीला १० टक्के पाणीकपात करण्यात आली. पुण्यात एक जूनपासून प्रतिदिन १२५० क्युसेक (घनफूट प्रतिसेकंद) एवजी १०५० क्युसेक पाणी घेण्यास सुरुवात केली. याचा अर्थ १८ टक्के पाणीकपात झाली. धरणांतून १.०८ टीएमसी पाणी जून मध्ये पुण्याला पुरवण्यात आले. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा काही जणांचा आग्रह आहे. पण पुणेकरांना एक दिवाआड पाणी मिळेल, अशी महापालिकेची खात्रीशीर यंत्रणा नाही. एक दिवस पाणी आले नाही तर काही भागांत दुसऱ्या दिवशी पाणी वेळेवर येत नाही किंवा येतच नाही. या योजनेमुळे अनेक भागांतील लोकांना अडचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.