Tag Archives: २१ जुलै

२१ जुलै दिनविशेष

नील आर्मस्ट्रॉँग

नील आर्मस्ट्रॉँग

जागतिक दिवस

  • शहीद दिन : बॉलिव्हिया.
  • मुक्ती दिन : गुआम.
  • वांशिक सलोखा दिन : सिंगापुर.

ठळक घटना

  • १७१८ : पासारोवित्झचा तह – ऑट्टोमन साम्राज्य, ऑस्ट्रिया व व्हेनिसचा राष्ट्रांमध्ये.
  • १७७४ : कुचुक-कैनार्जीची संधी – ऑट्टोमन साम्राज्य व रशियाने युद्ध संपवले.
  • १८३१ : लिओपोल्ड पहिल्याचा बेल्जियमच्या राजेपदी राज्याभिषेक.
  • १८६१ : अमेरिकन यादवी युद्ध – बुल रनची पहिली लढाई.
  • १८७९ : इंग्रज अधिकारी डॅनियल याने पंढरपूरच्या वाटेवर देवरनावडगी येथे एका बौध्द विहारात झोपलेल्या वासुदेव बळवंत फ़डके यांच्यावर झडप घालून त्यांना अटक केली.
  • १९०८ : लो. टिळकांना सहा वर्षाची कठोर शिक्षा ठोठावण्यात आली.
  • १९२५ : अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात उत्क्रांतीवाद शिकवल्याबद्दल जॉन टी. स्कोप्स या शिक्षकाला १०० डॉलरचा दंड.
  • १९४४ : दुसरे महायुद्ध – गुआमची लढाई.
  • १९६९ : नील आर्मस्ट्रॉँग व एडविन आल्ड्रिन हे चंद्रावर पाउल ठेवणारे पहिले मानव झाले.
  • १९७० : ईजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण.
  • १९७२ : आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी.
  • १९७६ : आयर्लंडमधील ब्रिटीश राजदूताची हत्या.
  • २००२ : अमेरिकेतील जगभर दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळे काढले.

जन्म

  • ३५६ : सिकंदर.
  • १४१४ : पोप सिक्स्टस चौथा.
  • १८९९ : अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकन लेखक.
  • १९३४ – चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९४५ : बॅरी रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४७ : चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६१ : अमरसिंग चमकीला, पंजाबी गायक.
  • १९७५ : रवींद्र पुष्पकुमार, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मॄत्यु

  • १४२५ : मॅन्युएल दुसरा पॅलिओलोगस, बायझेन्टाईन सम्राट.
  • १७९६ : रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश कवी.
  • १९३६ : जॉर्ज मायकेलिस, जर्मनीचा चान्सेलर.
  • १९९८ : ऍलन शेपर्ड, अमेरिकन अंतराळवीर.
  • २००१ : शिवाजी गणेशन, तमिळ अभिनेता.
  • २००२ : गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.