तांदळाचे अनरसे

साहित्य :

  • २५० ग्रॅम जुने तांदूळ
  • २५० ग्रॅ. गूळ
  • ५०० मि.ली. तूप.

कृती :

तांदूळ ३ दिवस भिजत घाल. रोज पाणी बदला. नंतर स्वच्छ धुवून तोपलीत निथळा व कपड्यावर पसरा. जरासे ओलसर असतानाच खलबत्त्यात कुटून घ्या व बारीक चाळणीने बारीक पीठ चाळून घ्या.
गूळ बारीक चिरून घ्या. तूप फेसून घ्या. त्यात गूळ घालून कालवा. नंतर त्यात मीठ घाला व मोठे मोठे लाडू करून डब्यात घालून ठेवा. ८-१० दिवस पीठ मुरू द्या. नंतर अनरसे करा.वरील पिठापैकी थोडे पीठ चांगले मळून घ्या. थोडेसे सायीचे दही किंवा पिकलेले केळे घेऊन पीठ मळा. त्याच्या लहान गोळ्या करा. कोरड्या ताटात कसखस पसरून अनारसा थापा.नंतर खसखशीची बाजू वर येईल असा तुपात सोडा व तळा.

2 thoughts on “तांदळाचे अनरसे

  1. Pingback: अधिकमासाचे महत्त्व | Adhikmaas Mahatva

Comments are closed.