तांदळाची खीर

साहित्य :

  • ७ चमचे तांदूळ
  • १ लिटर दूध
  • १० चमचे साखर
  • २ वेलदोडे (पूड)
  • सुकामेवा काजू
  • बदाम
  • चारोळ्या यापैकी असेल ते ( नसले तरी चालेल)

कृती :

तांदूळ धुवून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावेत. दूध तापवून त्याला उकळी आली की त्यात तांदूळ घालावे व सतत ढवळत राहावे. सुमारे तीस मिनिटे मंद गॅसवर शिजवावे. तांदळाचा दाणा हाताने दाबून पाहावा. मऊ झालेला असला व चटकन दाबला गेला की साखर घालावी व पाच मिनिटे आणखी चुलीवर ठेवून ढवळत राहावे. फार दाट वाटल्यास कपभर दूध घालावे. खाली उतरवून खीर गार झाली की त्यात वेलचीपूड व काजू, बेदाणे घालावे.

ही खीर जेवणानंतर पुडिंगसारखी बाऊलमध्ये घालून खायला द्यावी.