तांदळाची खीर

आपल्याकडे श्राद्ध पक्षाला तांदळाची खीर करण्याची पद्धत आहे. आपल्याला जेवढी खीर करायची असेल त्यावर प्रमाण ठरवावे.
साहित्य :

  • अर्धी वाटी बासमती कणी ३ कप
  • दूध
  • चवीपुरेशी साखर
  • ३-४ वेलदोड्याची पूड
  • २ बदामाचे काप
  • थोडासा बेदाणा
  • केशराच्या दोन काड्या

कृती :

तांदळाची कणी स्वच्छ धुवून एक ते सव्वा कप दूध घालून भात शिजवून घ्यावा.भात गरम आहे तोवरच तो डावेने घोटून घ्यावा. नंतर त्यात उरलेले दूध, साखर, वेलदोड्याची पूड घालावी. जरा वेळ उकळले व दाटसर खीर झाली की उतरवावी. वरून बदामाचे काप, बेदाणा व केशर घालावे.