तांदळाच्या चकल्या

साहित्य :

  • ५०० ग्रॅम तांदूळ
  • २५० ग्रॅम फुटाणे
  • २ चमचे तीळ
  • तिखट-मीठ
  • हिंग-हळद
  • तेल.

कृती :

तांदूळ धुवून वालवा व गिरणीतून दळून आणा. फुटाण्याची पूड करावी व चाळावी.तांदळाचे पीठ कोरडेच भाजून घ्या. साधारण निवले की त्यात फुटाण्याचे पीठ व इतर वस्तू घालून पीठ भिजवा. गार पाण्याने पीठ भिजवा व लगेचच चकल्या करा.