तांदळाच्या शेवया

साहित्य :

  • २ वाट्या तांदळाचे पीठ
  • २ वाट्या पाणी
  • १ टे. चमचा लोणी
  • अर्धा चमचा मीठ
  • १ नारळाचे दूध
  • चवीपुरेशी साखर
  • ३-४ वेलदोड्याची पूड.

कृती :

तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे. नंतर दळून आणावे. ह्या पिठातील २ वाट्या पीठ घ्यावे.एका पातेल्यात २ वाट्या पाणी उकळण्यास ठेवा. त्यात लोणी व मीठ घाला. पाण्याला उकली आली की त्याट २ वाट्या तांदळाचे पीठ घालून, उलथन्याच्या टोकाने ढवळा. नंतर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. २-३ वाफा आल्या की उतरवावे. नंतर ही उकड ताटात काढून घ्या. तुपाचा किंवा पाण्याचा हात लावून चांगली मळावी. ह्या मळलेल्या उकडीचे बेताच्या आकाराचे लांबट गोळे करावे.मोदकपात्रात पाणी घालून त्यावर चाळण ठेवावी. चाळणीवर एखादा कपडा किंवा केळीच्या पानाचा तुकडा घालावा. त्यावर हे गोळे टेह्वून १० ते १५ मिनिटे वाफवून घ्यावे. नंतर खाली उतरवून शेवेच्या सोऱ्याने वरील पिठाच्या शेवयाचे चवंगे तूप लावलेल्या ताटात पाडावे.नारळाचे बेताचे जाडसर दूध काढा. त्यात साकर किंवा गूळ घालून बेताचे गोड करावे. वेलदोड्याची पूड घालावी.ह्या दुधात शेवया घालून खायला द्या.