तांदळाच्या पिठाचे लाडू

साहित्य :

  • वाट्या तांदळाचे पीठ
  • दीड वाटी साखर
  • दीड वाटी तूप
  • १ वाटी ओले खोबरे
  • ४-५ वेलदोड्याची पूड
  • १ टेबल चमचा खसखशीची पूड.

कृती :

तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजत घाला. रोज पाणी बदला. नंतर उपसून सावलीत वाळवा. साधारण वालले की लालसर होईपर्यंत भाजा. नंतर दळून आणा.खसखस भाजून पूड करा. ओले खोबरे परतून घ्या. तांदळाच्या पिठाला तूप चोळून ठेवावे. साखरेत पाणी घालून एकतारी पाक करा. नंतर त्यात तांदळाचे पीथ, खोबरे, खसखस व वेलची पूड घालून ढ्वळा. नंतर जरा वाळल्यावर लाडू वळा. नारळ नको असल्यास सुके खोबरे थोडे भाजून घाला.