तसऱ्याचे वडे

साहित्य :

  • ४ वाटी तसऱ्या
  • नारळाची अर्धी कवड
  • दोन कांदे
  • तांदळाचा बारीक रवा
  • मिरचीपूड
  • १ चमचा हळद
  • थोडी चिंच
  • २ चमचे कारवारी सांबार मसाला

कृती :

तसऱ्याचे वडे

तसऱ्याचे वडे

तसऱ्या स्वच्छ धुवून त्यातील मांस काढून घ्या.

पाणी जास्त असल्यास काढून टाका.

कांदा बारीक चिरून खवलेला नारळ, मिरचीपूड, हळद, सांबर मसाला एकत्र कालवा.

त्यात थोडा चिंचेचा कोळ घाला. एक मूठभर रवा घाला.

लिंबाएवढे गोळे करून रव्यात घोळवून थापा व तव्यावर खोबरेल तेलात घालून भाजा.

चटणी या सॉससोबत सर्व्ह करा.