ती

ती

दोन बिजांचा जीव सानुला उदरी अंकुरतो
मातृत्वाचा खजिना लुटुनी स्त्री देहाला मान लाभतो

अस्तित्वाचा हुंकार ऐकूनी भाव-भावना उचंबळती
‘तो’ किंवा ‘ती’ जन्मा येवून बालपणीचा आठव देती

‘तो’ झाला तर सर्वोत्तम.. सार्थक होईल जन्माचे
‘ती’ झाली तर हाय दैवा झाली की ‘फसगत’

त्याच्यासाठी नवस, पारायणे, उपचार, उपवास
‘ती’ झाली ‘ती’ होईल हे अघटीत होणे खास

‘तो’ कींवा ‘ती’ होणे खरोखरच नाही स्त्रीचे हाती
सुशिक्षीत असूनही कलीयुगी या भ्रष्ट झाली मती

नऊ मासाची काय होणार याचा विचार होतो
निर्जिव यंत्राच्या मदतीने नितीमूल्यच संपवतो

‘तो’ काय? कींवा ‘ती’ काय? हाक मारणार ना ‘आई’
आईच्यातच इश्वर सामावलाय हीच ‘ती’ ची पुण्याई

2 thoughts on “ती

Comments are closed.