तिखट चिरोटे

साहित्य :

  • ३ वाट्या मैदा
  • १ डाव तुपाचे मोहन
  • १ चमचा जिरेपूड
  • १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ८-१० हिरव्या मिरच्या
  • मीठ.

साठा : १ डाव तूप फेसून त्यात तांदळाचे पीठ घालून साठा तयार करावा.
कृती :

हिरव्या मिरच्या व कोथिंबीर वाटून घ्या. नंतर सर्व एकत्र करून घट्ट पीठ भिजवा. तासाभराने पीठ कुटून घ्या व त्याच्या पोळ्या लाटा.नेहमीप्रमाणे पोळीला साठा लावून त्यावर दुसरी पोळी घाला. त्यावर पुनः साठा लावून तिसरी पोळी घाला व गुंडाळी करून ठेवा. नंतर त्याचे तुकडे कापून चिरोट्याप्रमाणे लाटून तळा.