तिखमिखळं कोशिंबीर

साहित्य :

  • १ मोठी किंवा २ लहान सिमला मिरच्या (भोपळी)
  • अर्धी वाटी ओले खोबरे
  • २ चमचे तेल
  • पाव चमचा मोहरी
  • पाव चमचा जिरे
  • १ चिमूट हिंग
  • १ चमचा मीठ
  • अर्धा चमचा साखर
  • १ वाटी दही ( कमी चालेल)
  • १-२ चमचे साय (असल्यास)

कृती :

मिरच्या धुवून पुसाव्या. दोन फांकी करून देठ, बिया, आतला गर काढून टाकावा व मिरच्या बारीक चिरव्या. लहान कल्हईच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरे व हिंग घालावा. या फोडणीवर चिरलेली मिरची घालून अर्धी वाटी पाणी घालावे. पाचसात मिनिटे मंद आंचेवर मिरच्या शिजू द्याव्यात. नंतर त्यात ओले खोबरे, मीठ व साखर घालून दोन मिनिटे शिजवावे. खाली उतरवून गार झाले की दही व साय घालून नीट मिसळावे फ्रीजमध्ये गार केल्यास जास्त छान लागते.