टोमॅटो भात

साहित्य :

  • २ वाट्या तांदूळ
  • २५० ग्रॅम टोमॅटो
  • २ चमचे तूप
  • ४ लवंगा
  • १ कांदा
  • १ वाटी ओले खोबरे
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
  • ४-५ लसूणपाकळ्या
  • १ इंच आले
  • २ दालचिनीचे लहान तुकडे
  • ८-१० काळी मिरी
  • १ लिंबू
  • २ चमचे मीठ (किंवा जास्त)
  • १ चमचा साखर

कृती :

टोमॅटो भात

टोमॅटो भात

तांदूळ धुवून तासभर निथळत ठेवावेत. टोमॅटो बारीक चिरून ४ वाट्या पाण्यात शिजवावेत. पुरणयंत्रावर पाण्यासकट गाळून घ्यावे.

भाताच्या पातलेल्यात तूप तापले की त्यावर लवंगा, काळीमिरी, दालचिनी घालून कांदा परतावा. एकीकडे आले-लसूण वाटून घ्यावे.

मिरच्या उभ्या चिराव्या. कांदा लालसर झाला की तांदूळ परतावेत व वाटलेली गोळी व मिरच्या घालावे. मीठ व साखर घालावी.

गाळून घेतलेले टोमॅटोचे पाणी घालावे. मंद आंचेवर भात शिजवावा. वाढताना त्यावर ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. जास्त आंबट आवडत असेल त्यांच्यासाठी लिंबाची फोड द्यावी.