टोमॅटो गाजर वड्या

साहित्य :

  • २५० ग्रॅम गाजरे
  • २-४ टोमॅटो
  • १ लिंबू
  • ४०० ग्रॅम साखर
  • ४ वेलदोडे
  • १ डाव तूप
  • २५ ग्रॅम बारीक चिरलेले काजू.

कृती :

गाजरे किसून घ्या. टोमॅटो बारीक चिरा. नंतर पुरणयंत्रातून त्याचा रस काढावा.नंतर गाजराचा कीस, टोमॅटोचा रस व साखर एकत्र करून शिजवा. मिश्रन घट्ट होत आले की लिंबाचा रस घाला. कडेने थोडे थोडे तूप सोडा. ढवळत रहावे. नंतर तूप लावलेल्या ताटात थापावे. वरून काजूचे काप पसरून पुन्हा जरा थापावे. थंड झाल्यावर वड्या पाडाव्या.