टोमॅटो वड्या

साहित्य :

  • १ नारळ
  • अर्धा किलो टोमॅटो (२ वाट्या रस)
  • ३ वाट्या साखर
  • ५-६ वेलदोड्याची पूड.

कृती :

टोमॅटो वाफवून घ्या. नंतर पुरणयंत्रातून रस काढा. नंतर खोबरे, साखर व टोमॅटोचा रस एकत्र करून शिजवा. मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलदोड्याची पूड घाला. नरम पोळी बनेपर्यंत शिजवा. नंतर खाली उतरवून तूप लावलेल्या थाळीत थापा.