टोमॅटोच्या वड्या

साहित्य :

  • ५०० ग्रॅम लालबुंद पिकलेले टोमॅटो
  • २ नारळ
  • ३ वाट्या साखर
  • १ वाटी पिठीसाखर
  • १ चमचा तूप

कृती :

टोमॅटो कुकरमध्ये पाणी न घालता शिजवू घ्यावे व पुरणयंत्रावर गाळून घ्यावे किंवा गरम उकळीच्या पाण्यात दोन मिनिटे ठेवावे नंतर साल काढून गाळ कुस्करून घ्यावा व मिक्सर मधून काढावा. नारळ खरवडून त्याचा चव मिक्सरमध्ये बारीक वाटावा. जाड बुडाच्या कल्हईचे पातेले घ्यावे. त्याला तूपाचा हात फिरवावा व नारळाचा चव, टोमॅटोचा गर व साधी साखर एकत्र करून मिश्रण चुलीवर ठेवावे. सतत ढवळावे. मिश्रण घट्ट होऊन कड सुटू लागली की खाली उतरावे. पिठी साखर घालून मिश्रण चांगले घोटावे. तूपाचा हात फिरवलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओतावे व हलवून सारखे करावे जरा निवाल्यावर वड्या कापाव्या.