त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्टय म्हणजे या लिंगात ब्रम्हा, विष्णु आणि महेश हे तीन देव असल्याचे समजले जाते, म्हणून याला त्र्यंबकेश्वर म्हटले जाते.

हेमाडपंथी पध्द्तीचं बांधकाम असलेल्या या मंदिराचे स्थापत्य आणि शिल्पकला हेही या मंदिराचे वैशिष्टच आहे. १२०० वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिराचा जिरणोद्धार नानासाहेब पेशवे यांनी केला. त्याकाळी त्यांनी ३० लाख रुपये खर्च करुन मंदिराची डागडुजी केली. ५००वर्षांपुर्वी इथं एक गाव वसलं होतं कालांतराने हे गाव त्रबंकेश्वर म्हणून नावारुपास आलं.

पेशवे काळात मंदिराबरोबरच गावाचा ही कायापालट झाला होता. या मंदिरातील ज्योतिर्लिंगावर पांडवकालीन मुकूट आहे. त्यावर मैवल्यवान हिरे आणि खडे जडलेले आहेत. नाशिक पासून १८ किलोमीटर अंतरावर असलेले त्रबंकेश्वर ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. या पर्वतावरच गोदावारी नदीचे उगमस्थान आहे. पुरणात ब्रम्हगिरी चा उल्लेख असून इथेच भगवान शंकरांनी स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली असे समजले जाते.

One thought on “त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

  1. Pingback: महिलाही गांडूळ खत निर्मितीत | Mahilahi Gandul khat Nirmitit

Comments are closed.