तुषार तळेकर ताळ्यावर आला

तुषार तळेकर हा भलताच कामचुकार व आळशी होता. कचेरीतील बहुतांश वेळ तो गप्पासप्पांत घालावी व स्वत: काम न करता इतरांच्या कामातही अडथळा आणि.

अखेर एकदा कचेरीच्या कामाच्या वेळात पाय ताणून वृत्तपत्र वाचत वसलेल्या तळेकरंजवळ त्याच्या खात्याचा प्रमुख अधिकारी गेला व आपल्या हातातील वृत्तपत्र त्याच्या हाती देत त्याला म्हणाला, तळेकर, तुम्ही यापुढे भारत समाचार या वृत्तपत्राएवजी मी देतो ते विश्वसमाचार वृत्तपत्र घ्यायला सुरुवात करा.कारण या विश्वसमाचार वृत्तपत्रात नोकरीच्या चिक्कार जाहीराती येत असतात.

ठाकठीक बसून तळेकरानं कुतुहुलानं विचारलं, पण साहेब, मला सुदैवान या कचेरीत चांगली नोकरी असताना, आतए मी नव्या नोकरीसाठी वॄत्तपत्रातल्या जाहीराती कशाला वाचू? यावर तो अधिकारी म्हणाला, हे बघ तळेकर, तुमची नेमणूक झाल्यापासून या कचेरीत ज्या तऱ्हेने काम करता, त्यावरुन मला तरी वाटतं की इथली तुमची नोकरी सुटल्यावर बेकार राहण्यापेक्षा, तुम्ही आतापासूनच दुसऱ्या ठिकाणच्या नोकरीच्या जाहिराती पाहू लागणं बरं.

त्या अधिकाऱ्याचा हा सज्जड सल्ला ऎकल्या दिवसापासून तुषार तळेकर ताळ्यावर आला व चांगले काम करु लागला.