उच्चांक असा गाठला

एका शिक्षणसंस्थेच्या मदतीसाठी एका नाटकाचा प्रयोग लावायचे ठरले. एका कार्यकर्त्या तरुणीनं तिकीट विक्रीचा उच्चंक घाठला. कार्यकर्त्यांच सभेत तिला विचारलं गेल, तू एवढी तिकिट कशी काय संपवू शकलीस ?

ते तरुणी म्हणाली, मी तिकिटांच पुस्तक हाती घेऊन घरोघर जाई. त्या घराचा माणूस मला लुच्चा व कंजूष असल्यासारखं वाटे. तिथे मी त्याला विचारी, साहेब १५ जानेवारीच्या रात्री आपण मोकळे आहात का ? विद्यानंद विद्यालयाच्या इमारत निधीसाठी आम्ही त्या रात्री नाटकाचा प्रयोग ठेवला आहे. आपण तिकिट घ्याव याकरीता आपल्याला विनंती करण्याकरीता मी आले आहे.

असं म्ह्टल्यावर तो कंजूष माणूस म्हणाला, अरेरे १५ जानेवारीच्या रात्री मला एका महत्त्वाचा कामासाठी एका ठिकाणी जायचं आहे. तुमचं नाटकं १४ किंवा १६ जानेवारीच्या रात्री असतं, तर मी माझचं काय पण माझ्यासंगे माझ्या घरच्यांचीही तिकिटं काढली असतो.

तो असं म्हणाला की एकदम स्मरण झाल्याचा आविर्भाव करुन मी त्याला सांगे, माफ़ करा हं ? मी चुकून १५ तारीख सांगितली. नाटक १४ जानेवारीलाच आहे. किती तिकिट देऊ आपल्याला ? मी असं म्हणाले की त्या माणसाचा नाइलाज होऊन, त्याला तिकिटं घ्यावीच लागत. तिकिटविक्रीचा उच्चांक मी असा गाठाला.