उडदाचे लाडू

साहित्य :

  • ५०० ग्रॅम उडदाची डाळ
  • २५० ग्रॅम डालडा तूप
  • ७५० ग्रॅम पिठीसाखर
  • ८-१० वेलदोड्यांची पूड
  • बेदाणा
  • थोडी चारोळी
  • बदाम-पिस्त्याचे थोडे काप.

कृती :

उडदाच्या डाळीचा रवा काढून आणावा. नंतर तुपावर रवा लालसर रंगाचा होईपर्यंत भाजावा.मिश्रण थंड झाले की परातीत ओतून चांगले फेसावे. नंतर त्यात पिठीसाखर वेलची पूड, बेदाणा वगैरे घालून मिश्रण सारखे करावे व लाडू वळावे. हे लाडू पौष्टिक असतात व थंडीच्या दिवसात खातात.