उडदाचे वरण

साहित्य:

 • २५० ग्रॅम आख्खे उडीद
 • २ कांदे
 • १ चमचा वाटलेले आले-लसूण
 • अर्धा चमचा जिरे
 • १ चमचे धनेपूड
 • २ हिरव्या मिरच्या
 • अर्धा चमचा तिखट
 • २ मोठे चमचे चांगले तूप किंवा लोणी
 • २ चमचे मीठ
 • ४ चमचे चिरलेली कोथिंबीर
 • अर्था चमचा गरम मसाला

कृती:

डाळ धुवून तीन तास भिजत ठेवावी. कांदे बारीक चिरावे. मिरच्यांना उभी चीर द्यावी. डाळीत कांदा, मिरच्या, आले-लसूण, जिरे, धनेपूड, तिकट घालून प्रेशरकुकरमध्ये डाळ शिजवावी. (प्रेशरटाईम-१५ मिनिटे) कुकर निवाल्यानंतर उघडून डाळ चांगली घोटावी व पुन्हा चुलीवर मंद उकळत ठेवावी. मीठ घालावे व पुन्हा २-२ उकळ्या आल्या की वरून लोण्याचा गोळा, गरम मसाला व कोथिंबीर घालून वाढावी.

पार्टीसाठी करायची असल्यास गरम डाळीवर अमूल लोण्याची एक वडी किंवा चमचाभर गोळा घालून टेबलावर ठेवावी.

हे वरण अतिशय पौष्टिक आहे व थंडीच्या दिवसात अवश्य करावे.