उंदीर आणि वडाची फळे

एका वडाच्या झाडाखाली काही उंदीर रहात असत. एके दिवशी त्यांस असे वाटले की, ज्या ज्या वेळी आपणास भूक लागते त्या त्या वेळी वडाची फळे खाण्यासाठी आपणास झाडावर चढवे लागते, हे काही ठीक नाही; यापेक्षा हे झाडच खाली पाडले तर बरे होईल. असा विचार करून, त्यांतले काही उंदीर त्या झाडाची मुळे कुरतडण्यास निघाले, तेव्हा जे शहाणे उंदीर होते, ते त्यांस म्हणाले, ‘बाबांनो, तुम्ही जे काय करीत आहात, त्याचा काय परिणाम होईल हे लक्षात आणा. एकदा हे झाड मोडून खाली पडल्यावर, पुढे जन्मभर आपणास जी फळे पाहिजेत, ती कोण देईल, याचा तुम्ही विचार केला काय ?’

तात्पर्य:- कोणत्याही गोष्टीचा परिणाम काय होईल याचा दूरवर विचार न करिता, तात्काकिक फायदयाकडे दृष्टी ठेवून ती गोष्ट करणे, हा मूर्खपणा होय.