उंटाचे प्रथमदर्शन

लोकांनी उंट जेव्हा पहिल्यानेच पाहिला तेव्हा त्याच्या पाठीवरील उंच मदार पाहून त्यांस इतके भय वाटले की, ते सगळे पळून गेले. पण पुढे जेव्हा त्यांनी उंटाचा निरुपद्रवीपणा पाहिला तेव्हा त्यांचे भय नाहीसे होऊन त्यांनी त्याला कामास लावले व शेवटी ते त्यास इतक्या बेफिकीरपणाने वागवू लागले की, त्याच्या पाठीवर मोठमोठाली ओझी लादून, त्यास गावोगाव हिंडवण्यासही त्यांनी कमी केले नाही.

तात्पर्य:- एखादीगोष्ट पहिल्यानेच दृष्टीस पडली म्हणजे मनुष्यास तिचे मोठे कौतुक किंवा भय वाटते, पण काही वेळाने ते कौतुक किंवा भय इतके कमी होते की, तो मनुष्य त्या गोष्टीस अगदी क्षुल्लक समजू लागतो.