उपवासाचे स्वीट काप

साहित्य :

  • दोन/तीन मध्यम आकाराची लांबट रताळी
  • अर्धी वाटी गूळ
  • अर्धा कप शेंगदाणा कूट
  • चिमूटभर वेलची पूड
  • तूप

कृती :

रताळी चांगली धुवा. त्याचे पातळसर काप करा. पातेल्यात पाणी घालून त्यात ते बुडवून ठेवा. नंतर पाण्यातून काढून चाळणीत निथळत ठेवा. गरम तव्यावर तूप घालून दोन्ही बाजूंनी काप कुरकुरीत तळून काढा. जेवढे काप त्याच्या तीन पट गूळ घेऊन थोडे पाणी टाकून गुळाचा पक्का पाक तयार करा. या पाकात तळून काढलेले कप घाला. वेलची पूड दाणेकूट घाला. थोडे ढवळून घ्या. त्यानंतर पसरट भांड्यात ताटात हे काप सुटे सुटे पसरून ठेवा. गार झाल्यावर खायला द्या. छान लागतात.