वाघनखांचं सामर्थ्य

गळ्यात वाघनख घातलेलं असलं की, मृत्युचं भय रहात नाही,’ असा पूर्वीच्या लोकांचा दृढ समज होता.

या समजाला अनुसरुन एका राजान एकदा आपल्या खुषमस्कऱ्याला विचारलं, ’हर्षदा ! हे पहा, माझ्या गळ्यातील कंठयात सोन्यानं मढविलेलं एक वाघनख आहे, अशा स्थितीत असं समज की मी या गडाच्य बुरुजावरुन खाली उडी घेतली, तर काय होईल ?’

खुषमस्कऱ्या हर्षदा झटकन म्हणाला, ’ महाराज, वाघनखाला खरोखरच काहीही होणार नाही.’