वाळवलेली कोथिंबीर

साहित्य:

  • कोथिंबीर
  • मीठ
  • तिखट किंवा ओली मिरची

कृती:

कोथिंबीर धुवून निथळून घ्यावी. बारीक चिरावी, त्यात वाटलेली ओली मिरची किंवा लाल तिखट व मीठ घालावे. ते एकत्र करून उन्हात वाळवावे.