वानरी आणि तिची पोरे

एका वानरीला दोन पोरे होती, त्यापैकी एका पोरावर तिची विशेष प्रीति असे. एके दिवशी काही कुत्रे तिच्या पाठीस लागले असता, तिने आपले आवडते पोर पोटाशी धरले आणि ती पळत सुटली. पळण्याच्या गडबडीत ते पोर एका झाडावर आपटले आणि तत्काळ मरण पावले. दुसरे पोर आईच्या पाठीस चिकटून बसले होते, ते अगदी सुरक्षित राहिले.