व्हॅनिला मिल्क शेक

साहित्य :

  • १ लि.दूध
  • साखर
  • ४ मोठे कप व्हॅनिला आईस्क्रिम
  • भुगा केलेला बर्फ

कृती :

दुधात साखर एकत्र करावी. हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ओतावे. त्यात दोन कप आईस्क्रीम घालावे. भुगा केलेला बर्फ घालून मिक्सरमधून काढावे. थंडगार मिल्कशेक व त्यावर (उरलेले) थोडेसे आईस्क्रीम टाकावे.