वरदविनायक महड

वरदविनायक महड

वरदविनायक महड

भ्क्ताभिमानी गणराज एकः ।
क्षेत्रे मढाख्ये वरदः प्रसन्नः ॥
यस्तिष्ठती श्रीवरदो गणेशः ।
विनायकस्त प्रणमामि भक्त्या ॥८॥

अर्थ :- भक्तांविषयी अभिमान बाळगणारा, गणांचा अधिपती गढ नावाच्या क्षेत्रामध्ये वास करणारा, ज्याचे रूप प्रसन्न करणारे आहे. अशा श्रीवरदविनायकाला माझा भक्तीपूर्वक नमस्कार.

मनोवंच्छित वर देणाऱ्या वरदविनायकाच्या देवळातील नंदादीप इ.स. १८९२ पासून गेली १०७ वर्षे अव्याहत तेवत आहे. हे इथले वैशिष्ट्य, महडच्या भोवतालचा प्रदेश निसर्गरम्य आहे. प्राचीन काळी ह्या क्षेत्राचे नाव भद्रक किंवा मढक असे होते आणि अनेक ऋषीमुनींनी येथे वास्तव्य केले होते.

भौगोलिक स्थान व मार्ग :-

रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात महड गावात श्रीवरदविनायक विराजमान आहेत.

  • मुंबई-पनवेल-खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलीकडे ६ कि.मी. अंतरावर हाळ येथे उजवीकडे महडसाठी रस्ता जातो. मुंबई-महड अंतर ८३ कि.मी. आहे.
  • मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतपासून महड २४ कि.मी. आहे आणि खोपोलीपासून ६ कि.मी.