वरई भगर

साहित्य :

  • दीड वाटी वर्‍याचे तांदूळ
  • थोडे जिरे
  • थोडे मीठ
  • थोडे तूप

कृती :

वरई भगर

वरई भगर

पातेल्यात तूप गरम करा. जिरे टाका.

ते तडतडू लागले की त्यात वर्‍याचे तांदूळ टाका. थोडेसे मीठ घाला.

पाणी घालून मंद आचेवर शिजवत ठेवा.

दाण्याच्या आमटीबरोबर खायला द्या.