वरई भाकरी

साहित्य :

  • जरुरी प्रमाणे वऱ्याचे पीठ
  • थोडे तिखट
  • मीठ
  • थोडे दूध

कृती :

एका परातीत पीठ, तिखट, मीठ घालून कालवून त्यात दूध घाला. भाकरी करतो तसे पीठ भिजवा. पिठाची भाकरी करा. तव्यावर टाका. फक्त वरून पाणी फिरवू नका. उलटा, चांगली शेका. तूप लावून गरम असतानाच खा.