वरई चकल्या

साहित्य :

  • अर्धी वाटी निवडून घेतलेली वरई
  • ६ हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • पाणी एक वाटी

कृती :

मिरच्या बारीक वाटून ठेवा. पातेल्यात पाणी उकळत ठेवा. त्यात अर्धा टे.स्पून मीठ टाका. त्यात वरई, वाटण घाला. झाकण ठेवा. आच मंद ठेवा. मऊसर शिजल्यावर मिश्रण थंड झाल्यावर पुरणाच्या यंत्रातून दळून घ्या. या पिठाच्या सोऱ्याने चकल्या करा. खडखडीत वाळवा. जरुरीप्रमाणे तळून खा.