वरई तांदूळ

साहित्य :

  • निवडून स्वच्छ केलेली वरई एक वाटी
  • पाव वाटी किंवा एक मध्यम बटाट्याच्या फोडी
  • पाव वाटी शेंगदाणा कूट
  • तूप दीड टी स्पून
  • जिरे थोडेसे
  • चार/पाच हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे
  • मीठ

कृती :

वरई तांदूळ तासभर भिजवून ठेवा. गॅसवर तूप गरम करा. त्यात जिरे, मिरच्या तुकडे घाला.जिरे तडतडू लागल्यावर बटाटा फोडी घाला. थोडे परता, त्यावर भिजवलेला तांदूळ घाला. थोडे परता, बदामी रंग आला की दाणे कूट, मीठ टाका. आता आच मंद ठेवा. तांदळाच्या वर बोटाचे एक पेर येईल एवढेच पाणी घाला. मंद आचेवर तांदूळ शिजू द्या. जरूर तेवढे पाणी घाला. शिजवल्यावर गरम गरम खा. वरून थोडे साजूक तूप घाला.