वाटल्या डाळीचे लाडू

साहित्य :

  • ५०० ग्रॅ. हरबऱ्याची डाळ
  • ४०० ग्रॅम तूप
  • ५०० ग्रॅम साखर
  • ५० ग्रॅम बेदाणा
  • २५ ग्रॅम काजू
  • ७-८ वेलदोड्याची पूड
  • थोडेसे केशरी पेढे.

कृती :

हरबऱ्याची डाळ रात्री भिजत घालावी. सकाळी उपसून वाटून घ्यावी. जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालावे व तुपावर डाळ परतून घ्यावी. मंदाग्निवर परतावी म्हणजे डाळ चांगळी परतली जाते. बदामी रंगावर आलीकी उतरवून बाजूला ठेवावी. साखरेत १ वाटी पाणी घालून पक्का पाक करावा. त्यात डाळ घालून ढवळा व लगेच उतरवा. नंतर त्यात वेलदोड्याची पूड, बेदाणे, काजूचे काप व चुरलेले पेढे घाला व ढवळून ठेवा. जरा निवल्यावर लाडू वळा.