व्हेजिटेबल बिर्याणी

साहित्य:

 • २ वाटी तांदूळ
 • २ कांदे
 • १ कप मटार सोललेला
 • २ गाजर
 • १ वाटी पनीर चिरलेले चौकोनी
 • २ बटाटे
 • १ लहान फ्लॉवर
 • ४ टॉमेटो
 • २ हिरवी मिरची
 • १ तुकडा आले
 • ४ चमचे तूप
 • थोडेसे काजू
 • १/२ लहान चमचा जीरे
 • १/२ चमचा लाल तिखट
 • १/२ लहान चमचा हळद
 • ४ लवंग
 • ४ हिरवी वेलची
 • २ तुकडे दालचिनी
 • १/२ लहान चमचा केशर
 • १/२ कप दूध
 • मीठ चवीप्रमाणे

कृती:

व्हेजिटेबल बिर्याणी

व्हेजिटेबल बिर्याणी

तांदूळ धुऊन शिजवून घ्या. कांदा बारीक चिरा. कढईत तूप गरम करुन कांदा परता, गुलाबी झाल्यावर लवंग, वेलची, दालचिनी वाटून टाका. जीरा, आले व हिरवी मिरची वाटून टाका. परतून टॉमेटोची पेस्ट टाका. लाल तिखट, हळद व मीठ टाका. मसाला चांगला परतून झाल्यावर बटाटा, फ्लॉवर व गाजर चिरून टाका. पनीर व मटार टाका. भाज्या थोड्या शिजल्यावर गॅस बंद करा. एका वाटीत १/२ दूध घेऊन त्याच्यात केशर भिजवा. शिजलेल्या भातात मीठ टाका. आता वाढायच्या भांड्यात खाली एक परत वरून भात टाका. त्याच्यावर दूध उरलेली भाजी टाका. आता बाकीचा भात टाकून दूध टाका. वर गोल टॉमेटो-कांदा व आख्खी हिरवी मिर्ची टाकून सजवा. या प्रकारे दोन परत भाजी व ३ परत शिजवलेल्या भाताची येईल. ताटली झाकून कमी गॅसवर २-३ मिनीटे शिजवा व गरम वाढा