विश्वास व एकोपा

सततचे साहचर्य, परस्परभावनांची जाण, तीनुसार होणारी कृती, कुटुंबप्रमुख सर्वांच्या कल्याणासाठी करत असलेला आटापिटा, सर्वांना समभावाने वागणूक देणारी गृहिणी, त्यासाठी ती घेत असलेले कष्ट, करत असलेला त्याग या सर्वांचा परिणाम म्हणजे परस्परांवर असलेला विश्वास व एकत्वभावना. यातून अडीअडचणींना तोंड देण्याचे सामर्थ्य व धैर्य निर्माण होते. या सर्व गोष्टींवर घराचे घरपण अवलंबून असते. हिंदू जीवनपद्धतीचा हा एक अविभाज्य भाग आहे.