पुण्यात एव्हरेस्ट वीरांचे जोरदार स्वागत

Pune Everest Team

‘एव्हरेस्ट’ वीरांची मिरवणूक ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण, रांगोळीसह फुलांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘जय भवानी’च्या जय घोषात जल्लोषात स्वागत करण्यात आले. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर मध्ये राहाणार्‍या प्रसाद जोशी, भूषण हर्षे आणि आनंद माळी या ‘एव्हरेस्ट’ वीरांच्या स्वागतासाठी मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन शिवसमर्थ प्रतिष्ठानाने केले होते.

मिरवणुकीला सुरुवात आनंदनगरमधील सोनामाता मंदिरापासून झाली. ‘एव्हरेस्ट’ वीरांचे आई-वडील, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत उपस्थित होते.

नगरसेविका मंजूषा नागपुरे, शिवसमर्थ प्रतिष्ठानाचे संस्थापक दीपक नागपूरे, नीलेश भिसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.