खडकवासला धरणात पाणीसाठा वाढला

पानशेत

पानशेत

शुक्रवारी रात्री खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोटात जोरदार पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. खडकवासल्याचा साठा या जोरदार पावसामुळे आता दीड टीएमसी झाला आहे. मात्र शनिवारी पावसाचा जोर ओसरला.
पानशेतमध्ये धरणात ३७ मिलीमीटर, वरसगावमध्ये ४३ मिमी व टेमघरमध्ये ४६ मिमी पाऊस पडला. या प्रकल्पातील पाणीसाठ्यात ०.१० टीएमसीने वाढ होऊन तो १.५१ टीएमसी एवढा झाला आहे.

या प्रकल्पाबरोबरच भीमा खोऱ्यातील कुकडी प्रकल्पातही चांगला पाऊस पडला. वडज धरणात पावसाची नोंद १६, माणिकडोह २३, पिंपळगाव जोगे २१ व येडगाव धरणात १३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय भाभा आसखेड ३०, वडिवळे ८३, पवना धरणात ३७, गुंजवणी ४५, नीरा देवघर २५ व भाटघर धरणात ३२ मिलीमीटर पाऊस पडला.

दरम्यान, पानशेत आणि वरसगावमध्ये सात मिलीमीटर व टेमघरमध्ये १३ मिमी पाऊस पडला. ४७ मिमी पाऊस पवना धरणात पडला. पानशेत व वरसगावमधून पाणीसाठा वाढल्यानंतर खडकवासला धरणात जास्त पाणी सोडण्यात आले. शहराला योग्य दाबाने पाणी मिळावे यासाठी खडकवासला धरणाची पाणीपातळी एक टीएमसीपर्यंत राखण्यास पाणी सोडण्यात आले.