Monthly Archives: फेब्रुवारी 2012

गीतेची आरती

जय देवी जय देवी जय भगवद्गीते ॥
आरती ओंवाळूं तुज वेदमाते ॥ ध्रु० ॥

सुखकरणी दुखहरणी जननी वेदांची ॥
अगाध महिमा तूझ नेणें विरिंची ॥
ते तूं ब्रह्मीं तल्लीन होसी ठायींची ॥
अर्जुनाचे भावें प्रगटें मुखींची ॥ जय देवी० ॥ १ ॥

सात शतें श्लोक व्यासोक्ती-सार ॥
अष्टादश अध्याय इतुका विस्तार ॥
एक अर्ध पाद करितां उच्चार ॥
स्मरणमात्रें त्यांचा निरसे संसार ॥ जय देवी० ॥ २ ॥

काय तूझा पार वर्णूं मी दीन ॥
अनन्यभावें तुजला आलों मी शरण ॥
सनाथ करीं माये कृपा करून ॥
बाप रखुमादेवीवर दास मान ॥ जय देवी० ॥ ३ ॥