२६/११ हल्ल्यातील प्रमुख दहशतवाद्यास अटक

जबिउद्दीन अन्सारी

जबिउद्दीन अन्सारी

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील प्रमुख संशयित आणि ‘लष्कर-ए-तैयबा’चा अतिरेकी सईद जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू हमजा (वय ३०) याला सोमवारी अटक झाली. २००८ साली मुंबईत जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यात दहा अतिरेकी सामील होते व या सगळ्यांना जबिउद्दीन याने हिंदी शिकवले होते. मुंबईसह भारतातील अनेक दहशतवादी कार्वायांना त्याच्या अटकेमुळे गती मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई येथील जबिउद्दीन मूळ रहिवासी आहे. सुत्रांनी माहिती दिली की, आखाती देशातून भारतात आल्यावर जबिउद्दीनला अटक झाली. देशाची सुरक्षा यंत्रणा तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ त्याच्या मार्गावर होती.