अक्रोडाचे लाडू

साहित्य :

  • २५० ग्रॅम खवा
  • १० अक्रोडचा गर
  • ८ चमचा पिठीसाखर.

कृती :

आक्रोडचा गर चुरून घ्या. हलक्या हाताने कुटून घ्या. अगदी पूड करायची नाही. साधारण जाडसर असावा. नंतर एका पातेल्यात घालून जरा परतून घ्यावा. तूप वगैरे घालायचे नाही.खवाही थोडासा परतून घ्या. नंतर त्यात साखर घालून प्रता. अक्रोडचा चुरा झाला. मिश्रण घट्टसर झाले की उतरवा व ताटात ओता. थंड झाले की छोटे छोटे वळावे.